Maharashtra news : नाशिक जिल्ह्यात अनेकांचे जीव वाचविणाऱ्या १०८ सेवेतील रुग्णवाहिका चालकावर दुर्दैवी वेळ आली.
अपघाताचा कॉल आला म्हणून तो नेहमीप्रमाणे धावपळ करीत घटनास्थळी पोहचला. समोर पाहतो तर काय स्वत:चा मुलगाच अपघात होऊन निपचित पडलेला.त्याचे असे झाले.
सटाण्यातील यशवंतनगर येथे रात्री साडेअकरा वाजता दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाला कळविण्यात आली. श्रावण खैरनार हे सटाणा ग्रामीण रुग्णालयात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर चालक आहेत. ते तातडीने घटनास्थळी पोहचेल. तेथे जाऊन पाहतात तर काय, अपघात त्यांच्या मुलालाच झाला होता.
सागर श्रावण खैरनार (वय २२, रा. वासोळ, ता. देवळा) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अहे. पोटच्या मुलाचा मृतदेह पाहून या चालक पित्याने हंबरडा फोडल्याने उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
सागर सटाणातील एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता. त्याचे वडील श्रावण खैरनार हे सटाणा ग्रामीण रुग्णालयात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर चालक आहेत. त्यांनी अनेकांचे जीव वाचविले आहेत. मात्र त्या दिवशी आलेल्या कॉलमध्ये त्यांच्याच मुलाचा अपघात झाला होता. मात्र, ते त्याला वाचवू शकले नाहीत. हे दृष्य पाहून पित्यासह उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाहीत.