अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पाच हजार बेडच्या हॅास्पिटलच्या नावाने 12 हजार कोटी रुपयांचा उद्धव ठाकरे सरकारने घोटाळा केला आहे. याचे सर्व पुरावे घेऊन आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत.
असे देखील किरीट सोमय्या यांनी सांगितले. तसेच किरीट सोमय्या यांनी असे ही सांगितले,या संदर्भात राज्य सरकार किंवा महापालिका यांच्यात कुठे ही चर्चा झाली नाही.
उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी एका खाजगी बिल्डराची जागा 3000 कोटींमध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव पास केला.
राज्यपालांना भेटून त्यांना मुख्यमंत्री कार्यालय, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासमोर लोकायुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी करणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले..
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved