उमरगा :- तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार व नंतर तिचा दोघांनी विनयभंग केला. तर दुसऱ्या घटनेत मुळज येथे मुलीची छेड काढून तिला घरासह पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तुगावमधील घटना बुधवारी तर मुळजची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी उमरगा व मुरूम पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तुगाव येथे १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बुधवारी घडली.
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन नराधमांवर मुरूम पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.