अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील १६ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे झाले. या रुग्णांनी कोरोनावर मात करून हा आजार बरा होऊ शकतो, हे दाखवून दिले.
यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एका ८५ वर्षीय आजीबाईंचा समावेश आहे.आज बरे झालेल्या रुग्णामध्ये नगर मनपा ०५, संगमनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येकी तीन, राहाता तालुका ०२, पारनेर, श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
आज बऱ्या झालेल्या रुग्णासह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णालयात १४४ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात १५ रुग्ण या आजाराने दगावले आहेत. सध्या जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या ५४४ इतकी झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews