अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यातील कुरण गावात एकाच दिवशी २२ कोरोना रूग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६१८ झाली आहे.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथे तब्बल 22 व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना बाधित असल्याचे मिळून आला आहे. त्यामुळे तेथे कोरोनाने थैमान घातल्याचे आता दिसून येत आहे.
यापुर्वी तेथे पहिल्यांदा दोन रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर थेट एका कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला तर त्यानंतर एक संशयित असतानाच खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला होता.
त्यानंतर कुरण हे कोरोनाचे केंद्र बनले. विशेष म्हणजे अगदी परवाच येथे सहा रुग्ण कोरोना बाधित मिळून आले होते. मात्र, काल कोरोनाचे तेथे अक्षरश: थैमान घातले असून चक्क 22 व्यक्ती कोरोना बाधित मिळून आल्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews