‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या कहरामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेले चित्रपट व मालिकांचं शूटिंग पुन्हा एकदा सुरु करण्यात आले होते. मात्र हेच शूटिंग आता धोक्याचे ठरले असल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे.

सोनी मराठीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं.

त्यादरम्यान येथील तब्बल 27 जणांना कोरोनानं ग्रासलं आहे. या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकरांची भूमिका आहे.

त्यांना या दरम्यान कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या आशालता यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24