अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात कोरोनाबाधितांची संख्या ११०५ वर पोहोचली. अवघ्या पाच दिवसांत ३१२ रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिकेने शंभर खाटांचे नवे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
शासकीय तंत्रनिकेतन येथे नव्याने शंभर खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
शहरात ४७ रुग्ण (२१ जुलै), ५९ रुग्ण (२२ जुलै) ७५ (२३ जुलै), ९० रुग्ण (२४ जुलै), तर शनिवारी दिवसभरात ४१ रुग्ण आढळून आले. पाच दिवसांत ३१२ नवे रुग्ण वाढले.
तथापि, रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. बाधित आढळून आल्यानंतर ते क्षेत्र प्रतिबंधित करण्याचा निर्णय मनपा घेते. तीन महिन्यांत शहरातील २६ भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आले.
मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शासकीय तंत्रनिकेतन येथे नव्याने शंभर खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्राच्या ठिकाणी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याचे आदेश त्यांनी महापालिकेच्या विभागप्रमुखांना दिले आहेत. नगर शहरात आतापर्यंत ३ हजार ५४६ व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com