Maharashtra News : मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगळा मार्ग तयार करणारी ‘रोल ऑन रोल ऑफ सेवा’ कोकण रेल्वे मार्गावर कमालीची यशस्वी ठरत आहे. गेली २५ वर्षे रो रो सेवा अविरत कार्यरत आहे. या सेवेच्या माध्यमातून कोकण रेल्वेला चांगला महसूल प्राप्त होत असून,
आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत ३४४ फेऱ्यांद्वारे १४ हजार ०२१ ट्रक्सची वाहतूक केली आहे. याद्वारे कोकण रेल्वेला तब्बल ३२.९८ कोटी एवढा महसूल प्राप्त झाला असून,
यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील ही सेवा मालवाहतूकदार आणि रेल्वेमधील दुवा ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मालवाहतूक हा कोणत्याही रेल्वे सेवेचा आर्थिक कणा समजला जातो. त्यामुळे कोकण रेल्वेने २६ जानेवारी १९९९ रोजी रो-रो सेवेला प्रारंभ केला. कोकण रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात मालवाहतुकीला अल्पप्रतिसाद मिळाला.
मात्र, कालांतराने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत गेला. गेल्या २५ वर्षांत सरासरी ८ लाख ट्रक या सेवेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यात आले आहेत. या सेवेच्या माध्यमातून कोकण रेल्वेला गेल्या ३ वर्षांत २०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे कोकण रेल्वेचे उपमहाप्रबंधक जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी सांगितले.
दरम्यान, सुरुवातीच्या काळात रो-रो सेवेत बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. यासाठी कोकण रेल्वेने वृत्तपत्रांत जाहिराती दिल्या. याशिवाय ट्रक चालक जेवणासाठी थांबत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक धाव्यांच्या ठिकाणी मराठी, हिंदी, पंजाबी व गुजराती भाषेत पत्रके वाटण्यात आली, तर मालवाहतूकदारांशी संपर्क साधून त्यांना या सेवेबाबत माहिती देण्यात आली.
दरम्यान, सुरुवातीला अल्पप्रतिसाद लाभलेल्या या सेवेचा सध्या ८ लाख ट्रक चालक फायदा घेत आहेत. या सेवेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण काहीसा कमी झाला आहे. गाडीची कमी झीज, इंधन बचत, वेळेची बचत, मालाची जलद वाहतूक आणि चालकांना तणावरहित प्रवास या सर्वांमुळे मालवाहतूकदारांच्या नफ्यामध्येदेखील मोठी वाढ झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर सुरू असणारी ही सेवा सध्या कोलाड ते वेर्णा, कोलाड ते सुरतकल आणि वेर्णा ते सुरतकल या मार्गावर सुरू आहे. भविष्यात या सेवेचा आणखी प्रसार होण्याची आणि प्रदूषणमुक्त वाहतूक सेवा देण्याचे कोकण देण्याचे कोकण रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
कशी आहे रो-रो सेवा
◀◀ दररोज तीन रेकद्वारे सेवा.
◀◀ एका रेकमध्ये ५० ट्रक ठेवण्याची व्यवस्था.
◀◀ ट्रकची उंची रस्त्यापासून ३.४ मी. असल्याचे तपासण्यात येते.
◀◀ रस्त्यामार्ग २४ तास लागतात तिथे रो-रो सेवेमार्गे १२ तासांत पोहोचता येते. तासांत पोहोचता येते.
◀◀ काही ठिकाणी ४० तास लागतात, तिथे २२
◀◀ प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित सेवा.
रो-रो सेवेद्वारे मिळणारे उत्पन्न आणि वर्ष
वर्षे उत्पन्न
२०१४-१५ ४७ कोटी ४ लाख
२०१५-१६ ५३ कोटी ३१ लाख
२०१६-१७ ५३ कोटी ७५ लाख
२०१७-१८ ५४ कोटी ४९ लाख
२०१८-१९ ५६ कोटी ६८ लाख
२०१९-२० ५६ कोटी ७५ लाख
२०२०-२१ ४६ कोटी ८२ लाख
२०२१-२२ ३७ कोटी ४७ लाख (डिसें.)
२०२२-२३ ५० कोटी ४५ लाख
२०२३-२४ ३२ कोटी ९८ लाख