अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात चार महिन्यांत प्रथमच एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल ३४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २ हजार २७ झाली.
चोवीस तासांत कोरोनामुळे पाच जणांचा बळी गेला. गेल्या २२ दिवसांत २० जणांचा बळी कोरोनाने घेतला. आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी शासकीय रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०, तर खासगी प्रयोगशाळेत व पोर्टलवर ३४१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण ८५४ असून, बरे झालेले रुग्ण १ हजार १३३ आहेत.
जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासे, पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर, कॅन्टोन्मेंट आणि महानगरपालिका आरोग्य यंत्रणेला या अँटीजेन कीटचे वितरण करण्यात आले.
गेल्या तीन-चार दिवसांत केलेल्या चाचण्याचा एकत्रित अहवाल सोमवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे येऊन त्यात बाधित आढळलेल्या रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली.
याशिवाय, खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ३४१ रुग्णांची नोंद ही एकूण रुग्ण संख्येत करण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com