अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. न्यायालयाच्या निकालाचे देशभर पडसाद उमटले आहेत.
भारतीय जनता पक्षाने देशभर जल्लोष सुरू केला आहे. अहमदनगर शहरात माजी मंत्री दिलीप गांधी व कार्यकर्त्यांनी फटाके आणि पेढेेे वाटून जल्लोष केला.
हा जल्लोष गांधी यांच्या घरासमोर झाला. यावेळी फटाके फोडण्यात आलेमा. माजी खासदार गांधी म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांपासून हा संघर्ष सुरू होता.
त्याला यश आले. रामजन्मभूमीच्या आंदोलनाचे नेतृत्व लालकृष्ण अडवणी यांनी केले. त्यांनी रथयात्रा काढली. रथयात्रा संगमनेर शहरातून गेली होती.
या रथयात्रेत मोठ्या प्रमाणामध्ये नगर जिल्ह्यातील कारसेवक सहभागी झाले होते. त्याच्या आठवण या निकालाच्या निमित्ताने झाली”. हा निकाल म्हणजे देशभरातील कोट्यावधी लोकांची रामावर असलेली श्रद्धा, संस्कृतीचा विजय आहे.
भावना आणि समाजाची येथेच नेतृत्व या आंदोलनातून झाले. हे नेतृत्व करताना कार सेवकांवर अनेक आरोप झाले. परंतु या निकालाने ही व्यथा देखील दूर झाली आहे, आणि त्याचा विशेष आनंद होतो, अशीही प्रतिक्रिया माजी मंत्री गांधी यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved