मुंबई : “भाजपने आमच्या 4 आमदारांना डांबून ठेवलं आहे,” असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी भाजपा वर केलाय. “भाजपने जे आमचे आमदार डांबून ठेवले आहेत त्यांच्याशी आम्ही सातत्याने संपर्क करत आहोत.” असेही नवाब मलिक म्हणाले.
राष्ट्रवादीचे सर्व आमदार सध्या रेनेसन्स हॉटेलमध्ये आहेत. मात्र नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना सुरक्षेच्या कारणात्सव रेनेसन्स हॉटेलमधील मुक्काम हलवा असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता हे सर्व आमदार हयात हॉटेलमध्ये राहणार आहेत.