महाराष्ट्र

डिसेंबरअखेर ४० घोटाळे उघडकीस आणणार !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- आतापर्यंत २८ घोटाळे बाहेर काढले असून डिसेंबरअखेर ४० घोटाळे उघडकीस आणणार आहे. त्याबाबतचे पुरावे आलेले असून ही प्रकरणे लोकायुक्तांकडे दाखल करणार आहे.

भ्रष्टाचारमुक्त भारत हे मोदींचे स्वप्न आहे. त्यामुळे आपला महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आपण काम करत आहोत, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी बुलडाण्यात सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे हे परबांची जमीन वाचवण्यासाठी धडपड करत असून महाविकास आघाडीचे सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

दरम्यान, सोमय्या यांना नागपूर सत्र न्यायालयाने समन्स बजावत २० नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणात शुक्रवारी मुंबई येथे बेलिफ सोमय्या यांच्या कार्यालयात समन्स बजावण्यासाठी गेला होता. परंतु सोमय्या कार्यालयात नसल्याने कर्मचाऱ्यांनी समन्य स्वीकारण्यास नकार दिल्याने बेलिफ परतल्याचे सांगण्यात आले.

Ahmednagarlive24 Office