अपघातात ५ वर्षाचा मुलगा ठार,गुन्हा दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मालवाहतूक टेम्पोने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ वर्षाचा मुलगा ठार झाला आहे.ही घटना पुणतांबा-शिर्डी रोडवर ‘कातनाल्याजवळ घडली.

याबाबत गणेश रतन मोरे वय ३५, धंदा मजुरी, रा. रामपूरवाडी रोड, म्हसोबावाडी, पुणतांबा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो चालकाच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादित म्हटले आहे की, फिर्यादीचा भाऊ बाळासाहेब भावजयी संगिता, पुतण्या अर्जुन असे सर्व अपे रिक्षा न. एमएच १७ बोझेड ०3७८ हिने गोदावरी वसाहत येथे चालले असताना

पाठीमागून आलेल्या मालवाहतूक ने भरधाव वेगाने टेम्पो चालवत रिक्षाला पाठीमागून जोराची घडक दिली. त्यात फिर्यादीचा पुतण्या अर्जुन बाळासाहेब मोरे, वय ५ वर्ष हा जबर जखमी झाला.

औषधोपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर घटना १० सप्टेंबर रोजी घडली. याबाबतचा गुन्हा काल २८ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24