महाराष्ट्र

New ST Buses : दोन वर्षांत ५१५० ई-बसेस येणार ! डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी…

Published by
Ahmednagarlive24 Office

New ST Buses : एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासन दरबारी विविध प्रयत्न सुरू आहेत. अशातच गतवर्षी डिसेंबर महिन्यात एसटीच्या ताफ्यात नवीन २० ई-बसेस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्यात एसटी महामंडळाने देशातील सर्वात मोठी ई-बसेसची निविदा काढली होती.

या निविदेअंतर्गत एसटी महामंडळ ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यातंर्गत २३५० मिडी बसेस व २८०० मोठ्या आकाराच्या ई-बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. यापैकी २० मिडी बसेस डिसेंबर महिन्यात एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्यात १२० ई बसेस टप्याटप्याने दाखल होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

एसटी बसेसचा तुटवडा, होणारे अपघात, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत एसटी महामंडळ नव्या बसेस दाखल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एसटी महामंडळ ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे.

त्यातंर्गत २३५० मिडी बसेस व २८०० मोठ्या आकाराच्या ई-बसेस यांचा यामध्ये समावेश आहे. यापैकी २० मिडी बसेस डिसेंबर महिन्यात एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, ३५ आसने असणारी ही मिडी बस वातानुकूलित आहे. एव्ही ट्रान्स प्रा.लि. या कंपनीने ई-बसेस एसटीला भाडेतत्त्वावर पुरवण्याचे कंत्राट घेतले आहे.

ओलेक्ट्रा डीडब्ल्यूएक्स ही एव्ही ट्रान्स कंपनीची उपकंपनी आहे. दरम्यान, या गाड्यांची पुढील काही दिवस चाचणी एसटी महामंडळाकडून घेतली जाणार आहे. त्यानंतर या गाड्या समितीद्वारे ठरवण्यात आलेल्या तिकीट दरासह धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

२२०० नव्या बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी करण्यासाठी काही एसटी बसेस सीएनजीमध्ये परावर्तित करण्यात येत असताना लवकरच एसटीच्या ताफ्यात २२०० नव्या बसेसची भर पडणार आहे. तयार बसेस घेण्यासाठी एसटी महामंडळाने निविदा प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू केली होती.

नुकतीच ही प्रक्रिया पूर्ण झाली असून लेलैंड कंपनीला टेंडर देण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. पुढील प्रक्रिया सुरू असून लवकरच या बसेसदेखील ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

Ahmednagarlive24 Office