7th Pay Commission Breaking : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मोदी सरकार डीए वाढीवर लवकरच निर्णय घेणार आहे.
1 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए वाढीला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. असे झाल्यास मार्चच्या पगारातील थकबाकीसह कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता दिला जाईल. तसेच मिळालेल्या माहितीनुसार यावेळी महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. सध्या महागाई भत्ता 38% आहे, जो 42% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जानेवारीत महागाई भत्त्यामध्ये झालेल्या वाढीच्या आधारे नवीन डीए मोजला जाईल.
केंद्र सरकारच्या सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. जुलै ते डिसेंबरपर्यंत AICPI निर्देशांकाचा सर्वोच्च आकडा 132.5 अंकांवर आहे. त्या आधारावर डीएमध्ये 4 टक्के वाढ निश्चित करण्यात आल्याचे मानले जात आहे.
डीए 90,720 रुपये असेल
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डीए दिला जातो. यामध्ये 4% वाढ झाली तर ती 42% पर्यंत वाढेल. यानंतर, 18,000 रुपये मूळ वेतन असलेल्यांचा वार्षिक महागाई भत्ता 90,720 रुपये होईल. सध्याच्या महागाई भत्त्यातील फरकाबाबत बोलायचे झाले तर, पगारात दरमहा 720 रुपये आणि वार्षिक 8640 रुपयांची वाढ होणार आहे.
किमान मूळ पगाराची गणना
1. कर्मचार्याचे मूळ वेतन रु. 18,000
2. नवीन महागाई भत्ता (42%) रुपये 7560 प्रति महिना
3. नवीन महागाई भत्ता (42%) रुपये 90,720 प्रतिवर्ष
4. आतापर्यंतचा महागाई भत्ता (38%) 6840 रुपये प्रति महिना
5. किती महागाई भत्ता वाढला 7560-6840 = 720 रुपये प्रति महिना
6. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु 8,640
कमाल मूळ पगाराची गणना
1. कर्मचार्यांचे मूळ वेतन रु 56,900
2. नवीन महागाई भत्ता (42%) 23,898 रुपये प्रति महिना
3. नवीन महागाई भत्ता (42%) रुपये 286,776 प्रतिवर्ष
4. आतापर्यंतचा महागाई भत्ता (38%) 21622 रुपये प्रति महिना
5. किती महागाई भत्ता वाढला 23898-21622 = रु 2276 प्रति महिना
6. वार्षिक पगारात वाढ 2276 X12 = रु. 27,312