7th Pay Commission :जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सातव्या वेतन आयोगाबाबत उत्तराखंड सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना अनेक मोठे फायदे मिळत असतात.
दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी, यूपी आणि इतर काही राज्यांमध्येही डीए वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनेही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे.
सीएम धामी यांच्या सरकारच्या या निर्णयाचा फायदा तीन लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. वृत्तानुसार, डीए वाढीचा लाभ सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या आर्थिक वर्षापासूनच मिळणार आहे.
अध्यादेश जारी झाल्यानंतर आता उत्तराखंडमध्ये महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के होणार आहे. उत्तराखंडच्या मंत्रिमंडळाने सीएम धामी यांना कर्मचार्यांचा भत्ता वाढविण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते.
तत्पूर्वी, सीएम धामी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामाचे कौतुक केले आणि पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यातील पाचही लोकसभा जागा जिंकेल, असे सांगितले आहे.
“पंतप्रधान मोदींनी गेल्या नऊ वर्षांत अभूतपूर्व काम केले आहे. आम्ही येथून पाचही लोकसभेच्या जागा जिंकू आणि ते जास्त मताधिक्याने जिंकू,” असे धामी यांनी शनिवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर सांगितले आहे.
डेहराडूनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला उत्तराखंडचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. 30 मेपासून सुरू होणाऱ्या देशव्यापी जनसंपर्क अभियानावरही परिषदेत चर्चा झाली.