महाराष्ट्र

7th Pay Commission: राज्य सरकारच्या ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्यात झाली इतकी वाढ, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

7th Pay Commission :- सध्या भारताची स्थिती पाहिली तर आगामी काही दिवसांमध्ये देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असून त्यानंतर देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील येऊ घातल्या आहेत. त्यामुळे साहजिकच देशातील जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून सरकारच्या कडून निर्णय घेतले जातील अशी सध्या परिस्थिती आहे.

यामध्ये जर आपण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांच्याकरिता देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये महागाई भत्तावाढीबद्दलचा प्रमुख निर्णय घेतला जाईल व महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होईल अशी एक शक्यता आहे व ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत यासंबंधीची घोषणा केली जाईल अशी देखील दाट शक्यता आहे.

महत्वाचे म्हणजे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत असून यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली तर तो 46% इतका होईल. या अनुषंगाने जर आपण  महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांच्या बाबतीत महागाई भत्याविषयी एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आली आहे.

 महाराष्ट्र सरकारने या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली वाढ

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आगामी येऊ घातलेल्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने  अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्या माध्यमातून अशा कर्मचाऱ्यांच्या डीएत वाढ करण्यात आलेली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करत तो 34 वरून 38 टक्के इतका करण्यात आला आहे.

सरकारने हा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून मात्र त्यामुळे आता राज्यावर नऊ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. जर आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत विचार केला तर साधारणपणे ऑगस्ट 2022 मध्ये महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करण्यात आलेली होती व त्यामध्ये आता परत चार टक्क्यांची वाढ करतो 34 वरून 38 टक्के इतका करण्यात आला आहे.

 केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

राज्य सरकारी कर्मचारी पाठोपाठ जर आपण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर एसआयसीपीआय इंडेक्सच्या आकडेवारीनुसार यावर्षी देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढू शकतो असे मानले जात असून असे झाले तर सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा 42 टक्के महागाई भत्ता हा वाढून 46% होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील कोट्यावधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे. परंतु केंद्र सरकारकडून अजून देखील याबाबतची अधिकृत घोषणा किंवा माहिती देण्यात आलेली नाही.

Ajay Patil