अहमदनगर ब्रेकिंग : बलात्काराची फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेस विवस्त्र करत सोडले रेल्वे रुळावर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- बलात्काराची फिर्याद पोलीस ठाण्यात दिल्याच्या रागातून एक 21 वर्षीय तरुणीस पोत्यात घालून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिचा खून करण्याच्या उद्देशाने रेल्वे रूळावर  फेकून देण्यात आले.

भाजी आणण्यासाठी गेलेल्या तरुणीचे  अपहरण करून नंतर तिला विवस्त्र अवस्थेत विळद परिसरात पोत्यात सोडल्याची घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.

एक 21 वर्षीय तरुणी हातपाय बांधलेल्या, तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या नग्न अवस्थेत विळद परिसरात रेल्वे रूळावर पोत्यात आढळली आहे. ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणीची पोत्यातून सुटका केली.

विळद परिसरातील रेल्वे रूळावर एका तरुणीला नग्न अवस्थेत, हात-पाय बांधून पोत्यात घालून आणून टाकले होते.विळद ग्रामपंचायतचे सदस्य संदीप जगताप, दगडू जगताप यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना दिली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

ही तरूणी गुरूवारी (दि. 21) गजानन कॉलनीत भाजी आण्यासाठी गेली होती. त्याचवेळी एका चारचाकी वाहनातून माझे अपहरण चौघांनी केल्याची माहिती या तरूणीने उपस्थितांना दिली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार अर्जुन वाघ, बंडू हिराजी मतकर, सुभाष कराळे, अर्जुन वाघ, अरुण मतकर, दिलीप नगरे (सर्व रा. जवखेड खालसा, ता.पाथर्डी, जि.अ.नगर) यांचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24