Maharashtra news:भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सोने, चांदी आणि पैशांनी भरलेली बॅग सापडली आहे. ही बॅग तेथे कशी आली, याबद्दल कोणालाच काही माहिती नाही.
मुंबई पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र, यामुळे खळबळ उडाली असून हा प्रकार संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.प्रसाद लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सकाळी पाचच्या सुमारास सुरक्षा रक्षकांचा फोन आला.
सुरक्षा रक्षकांनी घराबाहेर एक बॅग पडलेली असल्याचे सांगितले. त्यामुळे लाड घराबाहेर आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माटुंगा पोलिसही तात्काळ तेथे आले. त्यांनी या बॅगेची झडती घेतली असता त्यात सोने, चांदी आणि पैसे सापडले.
मात्र, ही बॅग कोणाची? ती तेथे कशी आली, याचबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. सुरक्षारक्षकांनाही याबद्दल सांगता आले नाही. त्यामुळे पोलिस आता घराबाहेर असणाऱ्या सीसीटिव्हीच्या फुटेजचा आधार घेत आहेत.