अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषदेतील सत्तेपासून भाजपला अर्थात विखे गटाला दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांशेप महाविकास आघाडीच्या उमेदवार राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची उपाध्यक्षपदी मंगळवारी बिनविरोध निवड झाली.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सदस्य व विद्यमान उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्या नावाची घोषणा पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी केली. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते दादापाटील शेळके यांचे पुतणे प्रताप शेळके यांच्या नावाची घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली.
हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार
या वेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले, दादा कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, क्रांशेपचे सदस्य सुनील गडाख, प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीचे गटनेते कैलास वाकचौरे, काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !
महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल झाल्यानंतर काही वेळातच भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुनीता खेडकर, तर उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या वेळी भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे उपस्थित होते. दुपारी खासगी वाहनातून महाविकास आघाडीचे सर्व सदस्य जिल्हा परिषदेत आले.
हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !
सभागृहात महाविकास आघाडीचे संख्याबळ ४७, भाजपचे ९ व विखे गटाचे ११ सदस्य होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजपच्या खेडकर व आठरे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. महाविकास आघाडीच्या घुले यांची अध्यक्षपदी, तर शेळके यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.