अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- अन्याय झाला कि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी खाकी वर्दी आपल्या अंगी चढवली त्यांच्याकडूनच अत्याचार झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबार येथील तरुणीस लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी नेवासा येथील उपनिरीक्षकासह तीन जणांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबारे येथील एका २२ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नेवासा पोलीस स्टेशनमधील पोलीस उप निरीक्षक समाधान वसंत भाटेबाल याने चाळीसगाव व नाशिकमध्ये २०१८ ते २०१९ या दरम्यान वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
तरुणीने याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक समाधान वसंत भाटेवाल, अरुण वसंत भाटेवाल,
वसंत भाटेवाल रा. नेवासा पप्पू कुमावत रा. चाळीस गाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved