अहमदनगर जिल्ह्यातील त्या सरपंचांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  खारी-टोस्ट विकणाऱ्या तरुणास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नान्नज दुमलाचे सरपंच व भाजपचे पदाधिकारी भिमराज नामदेव चत्तर यांच्यावर तालुका पोलिसात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना रविवारी दुपारी ४.३० वाजता नान्नज दुमाला बाजारतळावर घडली. घुलेवाडीचा संतोष धोंडिबा सोनवणे हा तरुण मारुती ओमिनीमधून खारी-टोस्टची विक्री करतो.

बाजारतळावर खारी विक्रीसाठी त्याने ओमिनी लावली असता तेथे सरपंच चत्तर आले. त्यांनी तरुणास वाहन काढण्यास सांगितले.

वाहन काढत असताना चत्तर यांनी तरुणास धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबतची फिर्याद सोनवणे याने तालुका पोलिसात दिल्याने चत्तर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24