नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार घातला आहे. यामुळे उभ्या पिकात पाणीच पाणी झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याच पार्शवभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौर्यावर होते. पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडविला.

पंचनामे, पाहणी करू नये, तर सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.

शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ आज गेले होते. पाथर्डी येथून भालगावकडे जात असताना पंचायत समितीच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविला.

नुकसानीची पाहणी करू नका, पंचनामे करू नका, सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24