पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या ही मादी …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  आष्टी वनपरिक्षेत्र विभागाच्या सावरगाव हद्दीत लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या अडकला.

परंतु हा बिबट्या तोच नरभक्षक आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या ही मादी आहे. त्यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आले आहे.

वनाधिकारी बिबट्याबाबत अधिकच सावध झाले आहेत. पाथर्डी वन परिसरात लावलेले पिंजरे पुढील काही दिवस तसेच ठेवण्याचा निर्णय पुना अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

दरम्यान पकडलेल्या मादी बिबट्याला जुन्नर येथील जंगलात सोडण्यासाठी पथक रवाना झाले आहे. तत्पूर्वी पकडलेल्या मादी बिबट्याचे लाळ नमुने घेतले आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुरड्यांशी या बिबट्याचा काही संबंध आहे का, हे तपासले जाणार आहे. त्याचा अहवाल येण्यास पंधरा दिवस लागतील, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी दिली.

पाथर्डी वनक्षेत्र मोठे आहे आणि पुढे काही धोका नको, म्हणून वनविभागाने या परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी लावलेले पथक पुढील काही दिवस तसेच कार्यरत राहणार आहे.

सुमारे शंभर कर्मचाऱ्यांचा फौजफाटा वन क्षेत्रात कार्यरत राहील. जंगल परिसरात लावलेले पिंजरे आणि सीसीटीव्ही कॅमेरे देखील तसेच ठेवण्यात आले आहेत

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24