‘वाघ’ म्हणून घेणार्‍यांची एका महिलेपुढे शेळी झाली…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे गैर आहेच, पण या गोष्टीचा निषेध करुन कंगनाचा संबंध भाजपाशी जोडणारे पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याबाबत अपशद्ब काढले जात होते,

त्यावेळी कोणत्या बिळात लपून बसले होते, असा प्रश्न भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष ऍड.अभय आगरकर यांनी उपस्थित केला. कंगना राणावत प्रकरणावरुन सध्या राळ उठली आहे. कंगनाने महाराष्ट्र, मुंबई यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपाने निषेध केला असल्याकडे ऍड.अभय आगरकर यांनी लक्ष वेधले.

त्यांनी म्हटले आहे की, कंगना प्रकरण अनेकांना आत्मपरिक्षण करायला लावणारे आहे. एका महिलेशी आपली वागणूक किती खालच्या पातळीवर घसरु शकते हे शिवसेनेने दाखविले. शिवसेनेमुळे सत्तेचे पद मिळालेले नको ती बडबड करत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रतिष्ठा राज्यासाठी निश्चितच महत्वाची आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत ते स्पष्ट केले आहे. पण ठाकरे यांना एकेरी शब्द वापरला म्हणून अस्मितेचे तुणतुणे वाजविणारे यापूर्वी कुठे गेले होते? त्यांची अस्मिता राज्याशी आहे की, व्यक्तीशी आहे?

माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले गेले, त्यावेळी संस्कृती कुठे गेली होती. ते देखील त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांच्याबद्दल अपशद्ब ऐकून टाळ्या पिटणारे आज मात्र राज्याच्या अस्मितेबाबत गळा काढत आहेत.

एका महिलेशी लढण्यासाठी सरकार मुंबई महापालिका यांची यंत्रणा वापरावी लागणे दुदैवी आहे. वाघ म्हणून घेणार्‍यांची एका महिलेपुढे शेळी झालेले देशाने पाहिले आहे. दाऊद इब्राहीमचे धमकीचे फोन आल्यावर रागापोटी त्याची मुंबईतील बेकायदा बांधकामे पाडण्याची हिंमत झाली नाही.

कंगना राणावत घरी नसताना तिचे बांधकाम पाडण्यात कोणती मुर्दमकी आहे? तिचे नाव स्वच्छतागृहाला देण्याचा हिणकस प्रकारची मानसिकता राज्यात महिलांचा आदर राखतील का? कंगणाचे बांधकाम पाडल्यामुळे न्यायायाने खडे बोल सुनावले.निदान आता तरी हिणकस मर्दुमकी थांबवावी व दुसर्‍यांना दोष देणे बंद करावे, असा सल्ला ऍड.अभय आगरकर यांनी दिला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24