काळजाचा ठोका चुकवणारी घटना…. त्यांची वेळ आली होती पण काळ आला नव्हता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- वेळ आली होती पण काळ आला नव्हता असे ऊस तोडणी मजूरांच्या बाबतीत अपघात होवून बचावल्याने घडले. चाळीसगाव (जळगाव) येथून कर्जत येथील अंबालिका कारखान्याकडे ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रक काल पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बेलापुर येथील प्रवरा नदीत कोसळला.

या घटनेत टक चालक व तीन मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील कामगार रुग्णालयात हलविले. या अपघातात योगेश रवींद्र सोनवणे, (वय १८), बापू शंकर गायकवाड, (वय ४०),

यशवंत सुदेश पवार, (वय १८), अशी जखमींची नावे आहेत. याबाबत घडलेली माहिती अशी कि, चाळीसगाव येथून ऊसतोड मजुरांना घेऊन कर्जत येथील अंबालिका कारखान्याकडे हा ट्रक, एमएच ४, एफपी ६६९९ जात होता.

गृहोपयोगी साहित्यासह वरील चौघे त्यातुन प्रवास करीत होते. दरम्यान बेलापुर परिसरातील प्रवरा नदीजवळील पुलासमोर काल पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक नदील कोसळला.

सध्या प्रवरा नदीतील पाणी पातळी कमी झाली आहे. हा ट्रक नदीकाठच्या एका बाजूला कोसळल्याने मोठा अपघात टळला. अपघाताची माहिती मिळताच नदी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी घाव घेतली. जखमींना तातडीने कामगार रुग्णालयात हलविले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24