अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- दौंड नगर लोहमार्गाच्या काम १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी पूर्ण केले. तो पूल दगडी कामात बनवलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुलाच्या बाजूलाच दुसऱ्या पुलाचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी काम चालू असताना एक मूर्ती सापडली.
कामगारांनी जेसीबीच्या साहाय्याने मूर्ती बाजूला घेतली. मूर्तीचा आकार खूप मोठा असल्या कारणाने जेसीबीच्या मदत घ्यावी लागली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हि मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली आहे. मात्र मूर्तीचे वजन जास्त असल्यामुळे ती वाहून आल्याची शक्यता नाही.
तज्ज्ञांनी मात्र ती या ठिकाणचीच असल्याची माहिती दिली आहे. या बाबत मात्र एक नवीनच खुलासा करण्यात आला आहे. या संदर्भात जिरेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सोनबा मचाले यांनी अधिकची माहिती दिली आहे. या मूर्तीची पूजा चालू असल्याची पण माहिती देण्यात आली.
हि मूर्ती दौंड शहरापासून कुरकुंभ मार्गे १४ किलोमीटर असलेल्या जिरेगाव येथील असल्याची माहिती देण्यात आली आहे. दत्त मंदिरात ही मूर्ती सोळा वर्षांपूर्वीच बसविण्यात आली आहे.या मंदिराचे शिखराचे काम होणार असल्यामुळे महादेवाची ही मूर्ती काढून टाकण्यात आली.
अशी मूर्ती मंदिराच्या जमिनीवर बसवणे शक्य नसल्यामुळे तिचे विसर्जन करण्यात आपले होते. नदी पात्रात हि भग्न मूर्ती सापडल्यापासून भाविक त्याची पूजा करत आहेत. काही उत्साही लोकांनी दुधाने मूर्तीस दुग्धाभिषेक देखील केला आहे. या माहितीला सरपंच भरत खोमणे यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे.
मंदिराच्या शिखराचे काम करायचे असल्यामुळे महादेवाची मूर्ती काढून ठेवली होती. परंतु ती भग्न झाल्यामुळे तिची विधिवत पूजा करून ग्रामस्थांनी तिचे विसर्जन केले होते.