भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पडला विहिरीत… मग गावकऱ्यांनी केले असे काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना, तसेच बिबट्याचा मानवी वस्तीकडे सुरु असलेला कल हल्ली वाढला आहे.

यातच संगमनेर तालुक्यात भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या आभळवाडी येथील

शेतकरी पोपट कापसे यांच्या विहिरीत बुधवारी (ता.14) सकाळी बिबट्या पडला होता. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या काही शेतकर्‍यांनी बिबट्या विहिरीत पडल्याचे पाहून त्या दिशेने धाव घेतली.

त्यानंतर बिबट्याला वाचवण्यासाठी शेतकर्‍यांनी शक्कल लढवत औताला बैलांना जुंपण्यासाठी आवश्यक असणारी जाडी आणली.

तिला दोन्ही बाजूंनी दोरी बांधत जाडीच्या माध्यमातून बिबट्याला वाचविले.तत्पूर्वी काही शेतकर्‍यांनी बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांना दिलेली होती.

माहिती समजताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वर काढण्यासाठी वन कर्मचार्‍यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला.

आणि जाडीवर विसावलेल्या बिबट्याने थेट पिंजर्‍यात प्रवेश केला. सध्या या बिबट्याची रवानगी चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24