अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लिपिकाच्या विरोधात तक्रार देणाऱ्या अल्पवयीन मुलास बुधवारी दुपारी बेदम मारहाण झाली. याप्रकरणी मुलाने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मुलाला त्याच्याच घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये मुलाच्या आईचाही समावेश आहे.
गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटत नाहीत तोच फिर्यादी मुलास मंगळवार बाजार परिसरातील मैदानात चार ते पाच जणांनी मारहाण करून फिर्याद मागे घे, अन्यथा तुला जीवे मारू अशी धमकी या अनोळखी व्यक्तींनी दिली.
याप्रकरणी मुलाने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ, आरोग्यधिकारी डॉ. अनिल बोरगे, लिपिक बाळू घाटविसावे व
अल्पवयीन मुलाची आई यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
महापालिका प्रशासनाने मिसाळ व बोरगे या अधिकाऱ्यांचा पदभार इतरांना दिला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होऊनदेखील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews