शासकीय विश्रामगृहातून अल्पवयीन विद्यार्थिनीला दिवसा पळविले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर – संगमनेर येथे एका शासकीय विश्रामगृहातून १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला काल भरदिवसा ४ च्या सुमारास अज्ञात आरोपीने काहीतरी अमिष दाखवून फूस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेले.

याप्रकरणी आश्रम शाळेचे नोकरदार कर्मचारी गणेश यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन विद्यार्थिनीला विश्रामगृहातून पळवून नेणारा अज्ञात आरोपी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोनि भुसारे यांनी घटनास्थळी भेट दिली. हेका देशमुख हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान संगमनेर शहर तालुका परिसरात गेल्या महिनाभरात अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेण्याचे प्रकार घडल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकांनी व समाजातील जबाबदार घटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

अहमदनगर लाईव्ह 24