लम्पी’मुळे शेतकऱ्यांपुढे नवे आव्हान ! कशी घ्याल काळजी ? वाचा सविस्तर माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : कोरोना महामारीपासून दूध व्यवसायाला लागलेले ग्रहण अद्याप सुटताना दिसत नाही. अस्मानी सुलतानी संकटाच्या एकापाठोपाठ एक बसत असलेल्या धक्क्यांनी पशुपालक हतबल झाले आहेत.

मागील तीन-चार वर्षांत महापूर, चाराटंचाई आणि पशुखाद्याचे वाढलेले दर, दुधाला मिळणारा कमी दर अशा संकटाबरोबर ‘लम्पी स्किन’ आजाराने ‘पशुपालकांचे मोठे नुकसान केले आहे.

“लम्पी स्कीन’वरील विशिष्ट लसनिर्मितीची प्रक्रिया सध्या सुरू असून, ही लस लवकरात लवकर निर्माण करावी आणि या लसीचा वापर सर्व पशुधनात करण्याची गरज आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले होते. त्यानंतर हिवाळा व उन्हाळ्यात हा आजार बर्‍यापैकी कमी झाला होता.

आता पुन्हा या वर्षीच्या ‘पावसाळ्यात लम्पी स्कीनचा विळखा वाढत असून, अनेक जनावरे या आजाराने बाधित झाली आहेत. दसरा, दिवाळीनंतर गावोगावच्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू होतो. त्यामध्ये पशुधनाचा सहभाग अधिक असतो. याच दरम्यान उसाचा गळीत हंगामही सुरू होतो. त्यामुळे ऊस वाहतुकीसाठी बैल मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात.

अशा वेळी लम्पी स्कीनचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्‍यता आहे.सध्या लम्पी स्किनवरची लस नसून, हा रोग टाळण्यासाठी देण्यात येणारी पर्यायी गोट बॉक्स लस आहे. या लसीची परिणामकारकता ८० टक्के आहे. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही २० टक्के जनावरे बाधित होण्याची शक्यता आहे.

‘स्वच्छ गोठा अभियान राबवणे गरजेचे लग्पी प्रतिबंदक लसीचा वापर सर्व पशुधनाला करावा लागेल. हे करत असतानाच लग्पी स्कीन आजाराची लागण, तसेच त्याचा प्रसार होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

बाधित जनावरांचे त्वरित विलगीकरण करून त्यावर शास्त्रशुद्ध उपचार घ्यावेत, लहान वासरे बाधित जनावरांच्या संपर्कात येऊ देऊ नयेत. जनावरांचे विलगीकरण झाल्यानंतर गोठा निर्जंतुक करून घ्यावा. लम्पीचा प्रसार कीटकांमार्फत असल्याने ‘माझा गोठा , स्वच्छ गोठा’ हे अभियान राबवणे गरजेचे आहे.