महाराष्ट्र

महाराष्ट्रात राजधानी मुंबईच्या धर्तीवर विकसित होणार नवीन शहर ! कुठं तयार होणार, काय सुविधा मिळणार ? वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra New Town : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्थेला येत्या काही वर्षांमध्ये सोन्याचे दिवस येणार आणि इंडियन इकॉनॉमी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठे इकॉनॉमी बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे. खास बाब अशी की भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

राज्याच्या विकासात देशाच्या आर्थिक राजधानीचा आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीचा अर्थातच मुंबईचा मोलाचा सहभाग आहे. मात्र अलीकडे मुंबईमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबईची लोकसंख्या पाहता हे देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले शहर बनले आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील पायाभूत सुविधांवर मोठा ताण येऊ लागला आहे.

प्रामुख्याने दळणवळण व्यवस्था यामुळे पार कोलमडीस आली आहे. विशेष म्हणजे रोजगाराच्या अन उद्योगधंद्याच्या शोधात अजूनही मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या ही विशेष उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत भविष्यात मुंबईमध्ये पाय ठेवायला देखील जागा उरणार नाही असे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने आता एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

तो म्हणजे आता मुंबई जवळ एक नवीन शहर विकसित होणार आहे. नवीन शहराला थर्ड मुंबई म्हणजेच तिसरी मुंबई म्हणून ओळखले जाणार आहे. मुंबईनंतर नवी मुंबई आणि आता नवी मुंबई नंतर मुंबईजवळ तिसरी मुंबई विकसित होणार आहे.

कुठं विकसित होणार तिसरी मुंबई

खरेतर तिसरी मुंबई विकसित होणार ही चर्चा गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी सिडको ने खोपटा नवनगर प्रकल्प देखील प्रस्तावित केला होता. मात्र आता तिसरी मुंबई विकसित होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात खरे उतरणार आहे. पण ही तिसरी मुंबई सिडकोच्या माध्यमातून विकसित होणार नसून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे तिसरी मुंबई विकसित करण्याचे काम देण्यात आले आहे.

राज्य सरकारने हे काम एम एम आर डी ए कडे दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पनवेल, उरण, पेन तसेच कर्जत तालुक्यातील 200 गावांमध्ये जवळपास 323 चौरस किलोमीटर क्षेत्रात एमएमआरडीएच्या माध्यमातून तिसरी मुंबई तयार केली जाणार आहे. यामध्ये नैना प्रकल्पांच्या गावांचा देखील समावेश होऊ शकतो असा अंदाज आहे. नैना क्षेत्रातील 80 गावांचा यामध्ये समावेश राहणार आहे.

या नवीन शहरासाठी एमएमआरडीएला न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणून विशेष अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान हे नव्याने विकसित होणारे शहर शिवडी-नावाशेवा सागरी सेतू या देशातील सर्वाधिक लांबीच्या सागरीसेतूने मुंबईसोबत कनेक्ट होणार आहे.

नवीन शहरात काय-काय सुविधा मिळणार

या नवीन शहरात लक्झरीयस आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे राहतील. यामध्ये व्यापारी संकुल, डेटा सेंटर, बहुराष्ट्रीय कंपन्या, बँका, वित्त संस्थांसाठी आवश्यक सुविधा, नॉलेज पार्क या सगळ्या सोयी सुविधा विकसित केल्या जातील. याशिवाय खारघर येथे बीकेसी सारखी सुविधा विकसित होणार आहे. नवी पनवेल ते कर्जतसाठी रेल्वे कॉरिडॉर सुद्धा तयार केला जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office