अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : आरोप-प्रत्यारोप करणे सोपे आहे. पण किमान डॉक्टर नसलेल्या माणसाने कुठल्याही आरोग्य विषयक यंत्रणेवर टिकाटिपण्णी करू नये.
पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सर्वच काम करीत आहेत. आम्ही सर्वच जण काम करीत आहोत. माझी सर्वच राजकीय लोकांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर व डॉक्टरांचे इक्यूमेंटवर टिकाटिपण्णी करू नये,
असा टोला खा. डॉ. विखे यांनी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांचे नाव घेता लगावला. आमदार रोहित पवार यांनी नुकताच नगर दौरा केला होता. कोरोनाच्या संदर्भातही त्यांनी आढावा घेतला होता.
यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर सदोष असल्याचा दावा केला होता. व भाजप सरकारवर टीकाही केली होती. याच अनुशंघाने खा. डॉ. विखे यांनी हा टोला लगावला आहे.
जिल्ह्यात करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पीएम केअर फंडातून नगरच्या जिल्हा रुग्णालयातील नव्या आयसीयूला 27 व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत.
नोबल मेडिकल फाउंडेशनतर्फे जिल्हा रुग्णालयामध्ये 20 खाटांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.
या विभागाचे उद्घाटन रविवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले. यावेळी खा. डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोनाचे संक्रमण वाढल्यामुळे करोना टेस्ट रिपोर्ट पेडिंग न राहाता 8 तासात ते यावेत यासाठी आम्ही आमच्या विळदघाट येथील लॅबमध्ये सरकारी दरापेक्षा 30 टक्के कमी दराने चाचणी करून देऊ, अशी घोषणाही डॉ. विखे यांनी यावेळी केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews