सणासुदीच्या काळात चोरट्यांचा हौदास; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यावर संकटामागून संकटे येत आहे. कोरोनाचे संकट संपते तोच चोरट्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.

एकीकडे अवैध धंद्यांवर कारवाई करणारे पोलीस प्रशासन वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात साफ अपयशी होत असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे वर्षाचे सण काही दिवसांवर आले आहे, त्यातच चोरटे सक्रिय झाले असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान आमदार रोहित पवारांच्या मतदार संघाला चोरटयांनी चांगलेच टार्गेट केले आहे. जामखेड तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासन देखील संभ्रमात पडले आहे.

दरम्यान जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथील सुजीत भास्कर वारे यांच्या घरामध्ये चोरटयांनी प्रवेश करून रोख रक्कम ८० हजार आणि दोन तोळे सोने चोरून नेले.

मागील चार दिवसानंतर तीन चोरीच्या घटना घडल्यानंतर पुन्हा आज घरफोडी झाली यामुळे शहरात घबराट निर्माण झाली आहे.

सध्या दिवाळी सन हा जवळ आला आसल्याने चोरटय़ांनी आपला मोर्चा शहराकडे वळवला आहे. शहरातील बीड रोड येथील दुकाने फोडून मोबाईल साहीत्य चोरुन नेले होते.

यानंतर चोवीस तासात या चोरटय़ांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र पुन्हा काही दिवसात मोरे वस्ती येथे चोरटय़ांनी मारहाण करून फिर्यादीच्या घरातील रोख रक्कम चोरुन नेली होती.

वारे यांच्या घरी चोरी झाल्यानंतर घटनास्थळी पोलीसांनी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24