कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन सुरु असून राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. अद्याप मालवाहतूक सुरू असून या वाहनांची तपासणी करण्याचं काम पोलिसांकडून केलं जातं आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील डफळापूर येथे नाकाबंदी चौकीवर पोलिसांसोबत कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला भरधाव ट्रकनं चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सांगली जिल्ह्यातील डफळापूर येथे नाकाबंदी चौकी तयार करण्यात आली आहे.
या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्याचं पोलिसांकडून केलं जात असून, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून नागरिक धोकादायक पद्धतीनं प्रवास करणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
दरम्यान, या पोलिसांना साहाय्य होण्यासाठी राज्य शासनानं शाळेतील शिक्षकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. डफळापूर शाळेत कार्यरत असलेले शिक्षक नाना कोरे हे नाकाबंदी चौकीवर होते.
कर्तव्यावर असताना कर्नाटकातून सिमेंट घेऊन एक ट्रक येत होता. पोलिसांनी हा ट्रक शिंगणापूर नाक्यावर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकानं ट्रक थांबवला नाही.
त्यानंतर पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. यात झटापटीत जत तालुक्यातील डफळापूर नाकाबंदी ठिकाणी ट्रक चालकानं शिक्षकालाचं जिवंत चिरडलं. यात शिक्षक नाना कोरे जागीच ठार झाले. घटनेनंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत