अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे, पूर्वीप्रमाणे वाढती संख्या काहीशी प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील काही गावपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे.
कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी या गावामध्ये जनता कर्फ्यू लागू करावी, अशी मागणी कोरोना ग्रामसुरक्षा समिती व ग्रामस्थ यांनी केली.
यानंतर प्रशासक प्रशांत तोरवणे व ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांनी हनुमान टाकळी गावामध्ये बुधवार दि. 14 ते शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
या काळात मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहणार असून थुंकणे, घोळक्याने विनाकारण फिरणे व मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
घराबाहेर पडताना या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, घराबाहेर जातांना मास्क वापरावा. गावामध्ये 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
गावामधील मेडिकल दुकान वगळता अन्य कोणतेही दुकान व्यवसाय सुरू राहणार नाही.नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई गावामध्ये विना मास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
वरील कालावधीत विनाकारण ग्रामस्थ एकत्र आल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 100 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved