मुंबईचे पोट भरणाऱ्या डब्बेवाल्यांवर उपासमारीची वेळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईचे श्वास असणारे डब्बेवाले बाराही महिने आपली सेवा देत पोट भरत असतात. अविरत सेवेद्वारे मुंबईकरांना ऊर्जा देण्याचे काम करण्याऱ्या डब्बेवाल्यांवर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे उपासमारीची वेळ अली आहे.

लॉकडाऊनमुळे त्यांचे पगार झाले नाहीत. काही प्रमाणात डब्बेवाले गावी गेले आहेत. परंतु, काही डब्बेवाले मात्र मुंबईत अडकून पडले आहेत. त्यामुळे अडकून पडलेल्या डबेवाल्यांची उपासमार होऊ नये यासाठी आम्हांला आर्थिक मदत करा अशी मागणी मुंबई डबेवाला संघटनेकडून करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना मुंबई डब्बेवाला संघटनेचे प्रवक्ते विष्णू काळडोके म्हणाले की,” डबेवाल्यांचे काम बंद झाल्यामुळे त्यांना पूर्ण महिन्याचा पगार मिळालेला नाही. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनला आता महिना उलटला आहे. आणखी तो किती दिवस राहिल याची काही माहिती नाही.

त्यामुळे आता काम नसल्यामुळे आमच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. नुकताच सरकारच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये इतकी आर्थिक मदत करण्यात आली आहे. याचं प्रमाणे राज्य शासनाने आमचा देखील विचार करून आम्हांला देखील 2 हजार रुपये इतकी मदत करावी.”

अहमदनगर लाईव्ह 24