अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-महाराष्ट्रात सिनेमांची एक वेगळीच क्रेझ आहे. मागील 2020 हे वर्ष कोरोनाच्या दहशतीखाली गेले. परंतु आता
नवीन वर्षात सर्व काही आलबेल होईल अशी अपेक्षा सर्वानाच आहे. तरुणाईला आता मनोरंजनाची ओढ़ लागलेली आहे. त्यांच्यासाठी नवीन वर्षात अनेक नवीन सिनेमे येणार आहेत. जाणून घेऊयात त्यांची लिस्ट –
– आरआरआर :- ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशानंतर एस. एस. राजामौली ‘आरआरआर’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात दोन स्वातंत्र्यसैनिकांची कथा दाखवली जाणार आहे.
– हीरोपंती 2 :- टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांचाच आगामी ‘हीरोपंती 2’ हा चित्रपट 16 जुलै 2021रोजी प्रदर्शित होणार आहे.
– अतरंगी रे :- आनंद एल राय दिग्दर्शित हा सिनेमा फेब्रुवारीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात अक्षय कुमार, धनुष, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत.
– नेल पॉलिश :- अर्जुन रामपालची यात मुख्य भूमिका असणार आहे. हा सिनेमा 1 जानेवारीला झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
– रामप्रसाद की तेरहवीं :- नसीरूद्दीन शाह, विनय पाठक यांचा सीमा पहवा दिग्दर्शित हा कॉमेडी सिनेमा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी चित्रपटगृहांत रिलीज होत आहे.
– कागज :- पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेला आणि सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा नव्या वर्षात झी-5 वर रिलीज होत आहे.
– 12’O’ Clock :- राम गोपाल वर्मा दिग्दर्शित हा सिनेमा 8 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होतोय. यात मिथुन चक्रवर्ती,मकरंद देशपांडे, फ्लोरा सैनी, मानव कौल मुख्य भूमिकेत आहेत.
– हाती मेरे साथी :- राणा दग्गुबती, विनीत विशाल, पुलकित सम्राट, जोया हुसैन आदी कलाकार असलेला हा सिनेमा जानेवारीतच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
– लाल सिंह चढ्ढा : – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा आपला आगामी ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट नवीन वर्षात प्रदर्शित करणार आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
– बेल बॉटम :- खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याचा नवीन ‘बेल बॉटम’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित करणार आहे. 2 एप्रिल 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
-मैदान :- बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन, प्रियामणी, गजराज राव तसेच रूद्रनिल घोष यांचा ‘मैदान’ हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.