आमदार रोहित पवार यांच्याकडून सूचक इशारा, म्हणाले जो जनतेचे हित पाहील त्यालाच…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : जनतेने ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून दिले, ते नगरसेवक मध्यंतरी गायब झाले होते. त्यांनी स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात गैर काय?

भविष्यात मात्र ज्यांची प्रतिमा स्वच्छ असेल व जो जनतेचे हित पाहील त्यालाच ताकद दिली जाईल असा सूचक इशारा आमदार रोहित पवार यांनी जामखेड मध्ये नगराध्यक्षांच्या घरवापसीच्या वेळी

नगराध्यक्ष निखिल घायतडक व दहा नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाल्यावर आमदार पवार यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात,

तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समिती सदस्य सूर्यकांत मोरे, नगरसेवक पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, वैजीनाथ पोले, राजेंद्र गोरे, हरिभाऊ आजबे, उमर कुरेशी, प्रकाश काळे, प्रशांत राळेभात, हनुमंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, निवडणुकीपर्यंत राजकारण आणि नंतर समाजकारण असे पक्षाचे धोरण आहे.नगराध्यक्ष व नगरसेवकांनी विकासासाठी आपल्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळेच त्यांना प्रवेश दिला. जे नगरसेवक बाहेर आहेत, त्यांनादेखील कामे करण्याची संधी दिली जाईल.

शहराचा विकास खुंटला आहे. प्रामुख्याने पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाईल. मागील आमदारांनी निवडणूक काळात फक्त कागदावर योजना मंजूर केली, परंतु आघाडी सरकारने सर्व तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली.

कोरोनाच्या काळात काही तांत्रिक अडचणी राहिल्या होत्या. त्यादेखील दूर केल्या असून लवकरच योजनेचे काम सुरू होणार आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर सुरू होणार आहे.

या संदर्भात आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो आहेत. शहरातील अंतर्गत रस्ते, गटारीचे नियोजन करावे लागेल, शाॅपिंग सेंटरच्या कामाला गती दिली जाईल.

महिला व पुरूषांना स्वतंत्र सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत. बसस्थानक अद्ययावत करून तेथे शॉपींग सेंटर उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे, असेही पवार यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24