ऐकावे ते नवलं ! काळ्या म्हशीच्या पोटी पांढऱ्या रेडकूचा जन्म ; चमत्कार म्हणावा की….

Published by
Ajay Patil

Viral News : आतापर्यंत आपण अनेक म्हशी पाहिल्या असतील त्यांचे पायडू किंवा रेडकू पण पाहिलं असेल मात्र आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व म्हशी ह्या काळ्याच असतील. शिवाय त्यांचे रेडकू देखील काळेच असेल. एखाद्या रेडकुच्या डोक्यावर, पाठीवर पांढरे ठिपके असू शकतात, मात्र संपूर्ण पांढर रेडकु किंवा म्हैस हुंडकूनही सापडली नसेल. मात्र सोलापूर जिल्ह्यात एका काळ्या म्हशीने पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिला आहे.

अगदी गाईच्या वासराप्रमाणे हे रेडकू दिसत आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर सर्वत्र याची चर्चा पाहायला मिळत आहे. काळ्या म्हशीच्या पोटी पांढऱ्या शुभ्र रेडकाचा जन्म झाला तरी कसा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मौजे वडवळ येथील पशुपालक शेतकरी राजकुमार कोटीवाले यांच्या म्हशीच्या पोटी पांढऱ्या शुभ्र रेडकाचा जन्म झाला आहे.

शेतकरी राजकुमार एक अल्पभूधारक शेतकरी असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून आणि अतिरिक्त उत्पन्न प्राप्तीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पशुपालन व्यवसाय करत आहेत. ते प्रामुख्याने म्हशीचे संगोपन करतात. आता त्यांची म्हैस व्यायली आहे. म्हैस व्यायली यात काही कौतुक नाही मात्र काळ्या म्हशीने पांढऱ्या रेडकाला जन्म दिला हे आश्चर्यकारक असल्याने सध्या या म्हशीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

दरम्यान याबाबत तज्ञ लोकांशी विचारपूस केली असता, त्यांनी सांगितल्याप्रमाणे, म्हशीचा त्वचेचा रंग हा मेलॅनिन नावाच्या पिंग्मेनमुळे काळा असतो. म्हणजेच नवजात रेडकामध्ये मेलॅनिन नावाचा पिंग्मेन ऍबसेंट असावा. म्हणजे पिंग्मेनशनमध्ये जेनेटिक बदलाचा हा परिणाम आहे. या म्हशीला पिल्लू व्हावे म्हणून इंजेक्शन देण्यात आले होते. यामुळे म्हशीला गर्भधारणा होत असताना विशिष्ट प्रकारच्या जनुकांच्या मिश्रणामुळे अशी घटना घडू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रा. डॉ. आकाश डोईफोडे, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, सातारा यांनी लोकमतला दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, जनुकांच्या विशिष्ट रचनेमुळे एखाद्या प्राण्यामध्ये अल्बेनिजम हा प्रकार आढळून येतो. ही एक दुर्मीळ घटना म्हणून ओळखली जाते. या प्रकारात रेडकूची प्रकृती उत्तम असते. तरीही रेडकूच्या तब्येतीकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते.

Ajay Patil