मशिन रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- रेल्वे रूळ दुरुस्त करणारी मशिन रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेनं जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मंगळवारी रात्री हा अपघात झाला. त्यात रेल्वेचे तीन कामगार जखमी झाले व एकाचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही मशिन बाजूला करण्याचं काम सुरू असून त्यासाठी दोन ते तीन तास लागणार आहेत. त्यानंतरच रेल्वे वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. करोनाच्या लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेली रेल्वे वाहतूक हळूहळू सुरू होत आहे.

सर्वांसाठी लोकल अद्याप सुरू झालेली नाही. महिला, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी कर्मचारी व राज्य सरकारची परवानगी असलेल्या कर्मचाऱ्यांनाच रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा आहे.

अहमदनगर लाईव्ह 24