अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाने नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहूल बळीराम वनारे असे या तरुणाचे नाव असून तो माकनेर, ता. मलकापूर, जि. बुलढाणा येथील रहिवासी होता. त्याचे वडील बळीराम आत्माराम वनारे, वय ५८ यांनी नेवासा पोलिसांना याबाबत खबर दिली.
राहूल हा हिंजवडी, पुणे येथील मर्सिडीज बेन्झ कंपनीत नोकरीस होता. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता तो त्याच्या नातेवाईकांसमवेत पुण्याकडे कामावर जाण्यासाठी मलकापूर येथून निघाला होता.
दुपारी पावणेचार वाजता त्याच्या बरोबर असलेला नातेवाईक सुहास वनारे याने फोन करून त्याच्या वडिलास सांगितले कि, प्रवरासंगम येथे गोदावरी नदीच्या पुलावर फोटो काढण्यासाठी थांबलो असता राहूल याने नदीपात्रात उडी मारली.
त्याचा नदीपात्रात शोध घेत असताना २० नोव्हेबर रोजी राहुल याचा मृतदेह मिळून आला. या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved