लग्नासाठी होणार्या छळास कंटाळून तरुणीची चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  मित्राकडून होत असलेल्या लग्नाच्या छळास कंटाळून २४ वर्षीय तरुणीने चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी नागपूरच्या मानकापूरमधील राज पॅलेस येथे घडली.

अंकिता कृष्णराव माकोडे (रा. जामदार वाडी, बिनाकी) असे मृत तरुणीचे नाव असून याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सौरभ शरद वसुले (वय २८, रा. जामदारवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, एकाच परिसरात राहात असल्याने सौरभ हा अंकिताला ओळखत होता. तीन वर्षांपूर्वी त्याने अंकिताला लग्नाची मागणी घातली होती. परंतु, शिक्षण घेत असल्याने अंकिता व तिच्या नातेवाइकांनी लग्नास नकार दिला.

दरम्यान, अंकिताने शिक्षण पूर्ण केले. गेल्या चार महिन्यांपूर्वी ती ब्रीझ कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून काम करायची. त्यातच काही दिवसांपासून सौरभ हा अंकितावर लग्नासाठी दबाव टाकत होता. तो तिचा छळही करीत होता. चार दिवसांपासून तो अंकिताच्या कंपनीत जाऊन लग्नाची मागणी घालायला लागला.

तिने सौरभ याची समजूत घातली. त्यानंतरही तो तिचा सतत छळ करायचा. मंगळवारी दुपारीही सौरभ हा अंकिताच्या कार्यालयात गेला. त्याने अंकितासोबत वाद घातला. बदनामी झाल्याचा मनस्ताप तिला झाला. त्यानंतर तिने चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24