गारूड्यांचा खेळ करणाऱ्यांचे आ. रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर ‘असे’ अनोखे आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- आज (सोमवार) १९ ऑक्टोबर रोजी मदारी समाजाच्या वतीने वसाहतीचे बांधकाम सुरु झाले नाही याच्या निषेधार्थ सकाळी साडे अकरा वाजता आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ सादर करत आंदोलन केले.

तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला.

तरी देखील मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू झाले नाही. या वसाहतीसाठी दोन वर्षापूर्वी ८८ लाख निधी आला. तरी काम झाले नाही.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

मदारी समाजातील खर्डा येथील बाजारतळावर ५० वर्षापासून अनेक गरीब मदारी समाज बांधव गोधडीचे पाल ठोकून राहत आहे. त्यांना व त्यांना मुला बाळांना अनेक वर्षापासून ऊन वारा पाउस यामधून जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.

दोन वर्षापूर्वी या वसाहतीसाठी ८८ लाख निधी आला तरी सुद्धा काम सुरु झालेले नाही. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

आम्हाला घरे बांधून द्यावेत अशी मागणी केली. यानंतर गारुड्याचा खेळ चालू केला. तासाभराच्या आंदोलनानंतर तहसीलदार कार्यालयासमोर पाल ठोकून ठिय्या दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24