अबब! ‘ह्या’ बँकांना २० हजार कोटींचा चुना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची हजारो कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरटीआयद्वारे सदर माहिती उघडकीस आली आहे.

या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत या बँकांची तब्बल 19 हजार 964 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. बँकांच्या फसवणुकीचे 2 हजार 867 प्रकार या काळात उघडकीस आले आहेत.

आरटीआय कार्यकर्ता चंद्रशेखर गौड यांनी याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेकडे मागितली होती. फसवणुकीचे सर्वात जास्त प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत घडले असून

रकमेचा विचार केला तर बँक ऑफ इंडियाची सर्वाधिक फसवणूक करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांपैकी स्टेट बँकेत फसवणुकीचे 2 हजार 50 प्रकार घडले आहेत.

फसवणुकीची एकूण रक्कम 2326 कोटी रुपये इतकी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये फसवणुकीचे 47 प्रकार घडले, पण एकूण फसवणूक केलेला आकडा 5125 कोटी रुपये इतका आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24