अबब! चक्क 10 लाखांचा गांजा पकडला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्शवभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाला अहोरात्र काम करावे लागत आहे.

त्याचबरोबरीने वाढती गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी देखील पोलीस प्रशासन कर्यरत आहे. दरम्यान जिल्ह्यातील संगमेनर तालुक्यात पोलिसांनी नुकताच 10 लाखांचा गांजा जप्त केला आहे.

संगमनेर शहराच्या हद्दीतील मालदाड रोडवरील कटारिया नगर येथे संगमनेर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत, सुमारे सहा लाख रुपये किंमतीचा गांजा व इतर साहित्यासह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून,

या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

*या तिघांना पोलिसांकडून अटक :- या कारवाईत जययोगेश्वर दगु गायकवाड (वय 24, मुळ रा. रांजणगाव देशमुख, हल्ली रा. शंकर टाऊनशिप, कटारीयानगर, संगमनेर) दीपक सुरेश तुपसुंदर (वय 34, खांडेश्वर मंदिराजवळ,

खांडगाव, ता. संगमनेर) व विशाल निवृत्ती आरणे (वय 26, मुळ रा. रांजणगाव देशमुख, हल्ली रा. दिवेकर एजन्सीजवळ मालदाड रोड, संगमनेर) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

रात्री उशिरा पोलिस उपनिरीक्षक राणा परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कटारीयानगर परिसरातील शंकर टाऊनशिप,

गल्ली क्रमांक 1 मधील काही तरुणांकडे अमली पदार्थ असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा मारला असता घरात चार गोण्यामध्ये गांजा आढळून आला.

याप्रकरणी काल रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24