अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- बीड: जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भोजगाव इथल्या अभिषेक राजेंद्र संत या विद्यार्थ्यांने ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पालकाने टॅब घेऊन दिला नाही.
म्हणून नाराज झालेल्या अभिषेकने 19 जून रोजी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अभिषेक दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता, काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अभिषेकने 81 टक्के गुण मिळवून पास झालाय.
त्यामुळे शेतात कामएकाच करणाऱ्या आई वडीलांना त्याचा निकाल ऐकून अश्रू अनावर झालेत. तर मुलाला टॅब घेऊन दिला नाही. म्हणून मुलगा गेला असल्याची खंत वडिलांनी बोलून दाखवली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com