साईकृपाला लागलेल्या आगीमध्ये सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीचा असलेला साईकृपा शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज लि.  या साखर कारखान्यात काही भागाला सोमवारी सायंकाळी आग लागली.

आगीमध्ये सुमारे दहा कोटी रुपयांचे आसपास नुकसान झाल्याची शक्यता असून उशिरापर्यंत फायर ब्रिगेडची वाहने आग विझवत होते. मात्र, नक्की नुकसान किती झाले, याबाबत अधिकृत माहिती दिली नाही.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील मालकीचा असलेला साईकृपा कारखाना हा हिरडगाव फाटा येथे आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला नसला, तरी अन्य कामे कारखान्यात सुरू होती.

सोमवारी सायंकाळी चारच्या सुमाराला कारखान्याचे काही भागाला आग लागली यात कुठली जीवितहानी झाली नाही. मात्र, आग मोठी असल्याने अग्निशामक यंत्रणा बोलावण्यात आली. उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

नक्की नुकसान किती झाले याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या कारखान्यात को जनरेशन, वीज निर्मिती सुरू असल्याने आगीत काय काय जळाले याची माहिती पंचनाम्यानंतर मिळेल.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24