Accident News : भीषण अपघातात चालती बस पलटी ! 31 प्रवासी जखमी

Accident News

Accident News : अपघातांच्या घटना सातत्यताने घडताना दिसत आहेत. अपघातांना विविध करणे असली तरी बेशिस्त वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था आदी कारणे कारणीभूत असल्याचेच दिसते. दरम्यान आता एका बस अपघाताचे वृत्त हाती आले आहे.

चालती बस उलटून भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ३१ प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. वर्ध्यात हा भीषण अपघात झाला आहे. वर्ध्यातील एसटी महामंडळाची बस उलटली आहे. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी लोकांना मदत करण्यास सुरुवात केली.

दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून काढण्याचे प्रयत्न सुरु होते. जखमींवर तातडीने उपचार व्हावेत या हेतूने जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले होते.

या अपघातामध्ये 31 प्रवासी जखमी झाले असून यातील 5 लोकांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त बस वरुडहून तळेगावकडे जात असताना यात 45 प्रवासी प्रवास करत असताना धाडी शिवारात एसटी बस रस्त्यावर पलटी झाली.

अपघातातील रुग्णांना मदत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले असून या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवण्यात आल्यावर पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेनंतर जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने अमरावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe