अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- जिमसाठी जवळा येथून निघोजला ज़ाणाऱ्या दुचाकीस्वाराचा रस्त्यात उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला धडकल्याने माल वाहतूक टेम्पोखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला.
येथील तुकाईमळा परिसरात निघोज -शिरूर रोडवर सांयकाळी सहा वा. हा अपघात घडला. अपघातानंतर जखमीला शिरूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जवळा (ता. पारनेर) येथील विशाल वसंत ढोकळे (वय २०) व निखिल संपत ढोकळे (वय १९), रा. जवळा, ता. पारनेर हे दोघे चुलत भाऊ दुचाकीवरून निघोज येथे जिमसाठी जात असताना तुकाईमळा परिसरात उसाच्या ट्रॅक्टरला त्यांच्या दुचाकीची धडक बसली
हे दोघे दोघे निघोजहून शिरूरकडे जाणाऱ्या एमएच १५ सीके. ५३४१ या माल वाहतूक टेम्पोच्या चाकाखाली आल्याने यातील विशाल वसंत ढोकळे हा जागीच ठार झाला तर निखिल संपत ढोकळे हा गंभीर जखमी झाला.
त्याला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शिरूर येथे दवाखान्यात हलविले असून, त्याचीही प्रकृती चितांजणक आहे. घटनेची माहिती समजताच निघोज पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे.